Posts

Showing posts from October, 2015

इयत्ता १ ते ५ मूल्यमापन नोंदी

====================== भाषा मराठी =========================== ०१. परिपाठात सहभागी होतो. ०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. ०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो. ०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. ०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो. ०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. ०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो. ०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. ०९. गोष्टी सांगतो. १०. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. ११. सूचना ऐकून पालन करतो. १२. स्वत:हून प्रश्न विचारतो. १३. कविता तालासुरात म्हणतो. १४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. १५. वेळोवेळी प्रश्न विचारतो. १६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. १७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो. १८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. १९. प्राणीमात्रावर दया करतो. २०. व

कुमठे बीट

Image
कुमठे बीट मुलं स्वत: शिकत आहेत... सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्‍वास बसत नाही. सातार्‍याजवळच वाईमध्ये ‘भारत विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच शाळेत मला पहिल्यांदा समजलं. रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्या

डिजिटल शाळेसाठी आवश्यक साहित्य

आता प्रत्येक शाळा होईल डिजीटल मित्रांनो आता कोणतीही शाळा होणार डिजीटल. विश्वास नाही ना बसत ! पण हो हे शक्य आहे मी आपल्या समोर सादर करत आहे, डिजिटल वर्ग करण्यासाठी लागणारी किमान ते कमाल साधने व त्यासाठी लागणारा अंदाजे खर्च. डिजिटल साधनांचे प्रामुख्याने दोन प्रकारांत वर्गीकरण करता येईल १. आंतरक्रिया पात्र नसलेली साधने (Non Interactive Equipment)  उदा :- रेडीओ, टेपरेकॉर्डर, टेलीविजन, सिडी प्लेयर, सिडी डिव्हीडी, कैसेट, प्रोजेक्टर साधा इत्यादी २. आंतरक्रियात्मक साधने (Interactive Equipment)  उदा :- स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक, इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड, इंटरअॅक्टिव्ह प्रोजेक्टर, इंटरअॅक्टिव्ह टेबल, इंटरअॅक्टिव्ह स्लेट, इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन, विमोट, यु लाईट आता ही साधनाची जमवाजमव करुन किमान किती रुपयात आपण डिजीटल वर्गखोली तयार करु शकतो ते पाहूया. खालील पैकी कोणतेही एक option निवडा व होऊन जा डिजीटल १.स्मार्टफोन :- 2 Gb ram, Core processor, 8 Gb internal storage, नवीन android version असणारा स्मार्टफोन कमीत कमी 7000/- रुपयापर्यंत मिळतो. ज्यात लाखो श
ज्ञानरचनावाद अलीकडे ज्ञानरचनावाद   हा शब्द  शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? इ . प्रश्न आपल्या  मनात येतात .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा(NCF२००५ )  याचा तो पाया आहे ‘त्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम   2009 (RTE ) मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये  त्याचा  जास्तीत जास्त वापर  करणे  प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे .          आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत  असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .         ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी  साम्य  असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .        ज्ञानरचनावादाची प्रस्तुती  वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही  विरोधाभास  आढळत नाही .त्या  स
आपले १०वी १२वीचे प्रमाणपत्र डाउनलोड करून आपल्या मोबाईल/संगणकावर जतन करुन ठेवा येथे क्लिक करा