ज्ञानरचनावाद अलीकडे ज्ञानरचनावाद हा शब्द शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? इ . प्रश्न आपल्या मनात येतात .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा(NCF२००५ ) याचा तो पाया आहे ‘त्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधीनियम 2009 (RTE ) मधील कलम २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करणे प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे . आपण नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावून आपण जगत असलेले विश्व समजवून घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे . ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी साम्य असलेल्या आणखी काही शास्त्रज्ञानी आपले विचार मांडलेले आहेत . ज्ञानरचनावादाची प्रस्तुती वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही विरोधाभास आढळत नाही .त्या स
Comments
Post a Comment